Advertisement

पोलीस पुतळ्याच्या डागडुजीसाठी युवासेना सरसावली


पोलीस पुतळ्याच्या डागडुजीसाठी युवासेना सरसावली
SHARES

मुंबईकरांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांचा 5 फूट उंचीचा पुतळा वरळीच्या पोलीस कॅम्पमध्ये बसवलेला आहे. हा पुतळा 11 वर्षे जुना असून वरळी पोलीस कॅम्प येथील नरेश पाटील चौकात सर पोचखनवाला रोडवर बसवण्यात आला आहे. 11 वर्षांपूर्वी दत्ताजी नलावडे आमदार असताना त्यांच्या कार्यकाळात हा पुतळा या ठिकाणी पोलिसांचे प्रतीक म्हणून लावण्यात आला.महापालिकेकडून दुर्लक्षित

आज 11 वर्षानंतर 5 फूट उंची असलेल्या फायबरच्या पुतळ्याला तडे गेले होते. परंतु पोलिसांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या पुतळ्याला तडे आणि रंग गेल्यानंतर तो महापालिकेकडून दुर्लक्षित झालेला होता.

महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वरळी युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांनी लक्ष घालून या पुतळ्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. या पुतळ्याची डागडुजी सुरू असलेली पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


वरळीतल्या या पोलीस कॅम्पमध्ये अनेक कुटुंब रहातात. येथील प्रत्येकासाठी हा पुतळा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण महापालिका प्रशासनाला या पुतळ्याच्या डागडुजीचा विसर पडला आहे. सदैव संरक्षण करणारे पोलीस सरकारदरबारी दुर्लक्षित आहेतच. निदान पोलिसांच्या पुतळ्याकडे तरी प्रशासनाने लक्ष घालणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन या पुतळ्याची डागडुजी करत आहोत.

- अभिजित पाटील, उपविभागीय अधिकारी, युवासेना, वरळी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा