Advertisement

दिलासादायक! २४ तासांत मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

रविवारी मुंबईत २८ हजार ६९७ चाचण्या करण्यात आल्या. यात ३६७ नवीन रुग्ण आढळले, तर ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दिलासादायक! २४ तासांत मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही
SHARES

कोरोना या जीवघेण्या व्हायरसमुळं आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रविवारी नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कोरोनामुळं मुंबईत रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. २६ मार्च २०२० ला मुंबईत एकही कोरोना रुग्ण दगावला नव्हता. मात्र नवीन ३६७ रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ५० हजार ८०८ पर्यंत पोहोचली आहे.

रविवारी मुंबईत २८ हजार ६९७ चाचण्या करण्यात आल्या. यात ३६७ नवीन रुग्ण आढळले, तर ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत मुंबईत ७ लाख २७ हजार ८४ रुग्ण बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत १६ हजार १८० जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबईतील मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र, लाट ओसरल्यावर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. मागील काही दिवसांपासून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २ ते ६च्या दरम्यान आहे. १० ऑक्टोबरला ६ जण, ११ ऑक्टोबरला ४ जण, १२ ऑक्टोबरला २, तर १५ ऑक्टोबरला ५ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला होता.

रविवारी मुंबईत एकही मृत्यू झालेला नाही. २६ मार्च २०२० ला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा