कचराच कचरा !

 Malad
कचराच कचरा !

मालाड - मालाड पश्चिमेकडच्या आयोजन नगर परिसरात सध्या जिथेतिथे कचराच पहायला मिळतोय. कचरा टाकण्यासाठी इथे कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कचरा कचराकुंडीपेक्षा बाहेरच जास्त पडलेला पहायला मिळतोय. पालिकेचं याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्याला लागूनच फादर अॅग्नेलो शाळा आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना याच परिसरातून प्रवास करावा लागतो. तसंच कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचीही स्थानिकांची तक्रार आहे. पालिका अधिका-यांशी संपर्क साधला असता अतिरिक्त कचरापेट्यांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पी उत्तर विभागाचे अभियंता प्रकाश गायकर यांनी दिली आहे.

Loading Comments