Advertisement

मुंबईत रंगणार ब्लाइंड क्रिकेट स्पर्धा


मुंबईत रंगणार ब्लाइंड क्रिकेट स्पर्धा
SHARES

मुंबईत 24 व्या नॅशनल ब्लाईंड क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट आणि क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडिया यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.  30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान शिवाजी पार्क मैदानावर ही स्पर्धा रंगणार आहे. या टुर्नामेंटमध्ये दोन गटात प्रत्येकी 4 संघांचा समावेश असेल. प्रत्येक गटातून गुणतालिकेच्या‍ आधारावर दोन संघांची निवड करण्यात येईल.


विजेत्या संघाला मिळणार पारितोषिक

या टुर्नामेंटमधील विजेत्या संघाला चषक आणि 50,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, तर उपविजेत्या संघाला ट्रॉफीसह 30,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. याचसोबत सामनावीर/ मालिकावीर/ सर्वोत्कृष्ट फलंदाज/ सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना खास स्मृतिचिन्हे देण्यात येतील.


भारतीय क्रिकेट संघात होणार यांची निवड

विशेष म्हणजे दुबई आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2018 साठी या स्पर्धेतील 17 सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड भारतीय संघात केली जाणार आहे.

पाकिस्तान ब्लाइंड क्रिकेट काऊंसिल आणि वर्ल्ड ब्लाइण्ड क्रिकेट लि. यांच्या सहयोगाने ही विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील अंध खेळाडूंसाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा