Advertisement

'डी कंपनी'नं केल्या भारताच्या ३ टेस्ट मॅच फिक्स?


'डी कंपनी'नं केल्या भारताच्या ३ टेस्ट मॅच फिक्स?
SHARES

गेल्या २ वर्षांत भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या टेस्ट मॅचपैकी ३ टेस्ट मॅच फिक्स होत्या दावा करणारी डाॅक्युमेंट्री अल जजिरा वृत्तवाहिनीच्या अन्वेषण विभागाने प्रसिद्ध केल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली अाहे. विशेष म्हणजे, मुंबईस्थित एक माजी क्रिकेटपटू, यूएईतील भारतीय जाहिरात संस्थेचा पदाधिकारी अाणि 'डी कंपनी'नं अापल्या कनेक्शनचा वापर करत हे सामने कसे फिक्स केले, याचं फूटेजही या दोहास्थित वृत्तवाहिनीने सर्वांसमोर आणलं आहे.


भारताचे 'हे' सामने फिक्स?

भारत अाणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं झालेली टेस्ट मॅच (१६ ते २० डिसेंबर), भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात रांची इथं झालेली मॅच (१६ ते २० मार्च २०१७) अाणि भारत अाणि श्रीलंका यांच्यात गाॅल इथं झालेली (२६ ते २९ जुलै २०१७) टेस्ट मॅच अशा ३ मॅच फिक्स असल्याचा दावा या वृत्तवाहिनीनं केला अाहे.

'क्रिकेट मॅच-फिक्सर्स' या नावानं दाखवण्यात अालेल्या या डाॅक्युमेंटरीमध्ये या तिन्ही मॅचमधील काही सत्रांचा खेळ किंवा पूर्ण मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला अाहे. मात्र या मॅचमध्ये भारताच्या एकाही खेळाडूंनं मॅचफिक्सिंग केल्याचा उल्लेख वृत्तवाहिनीने केलेला नाही.


पाकिस्तान, श्रीलंकेच्या खेळाडूंचा समावेश

पत्रकार डेव्हिड हॅरिसन यांनी हे स्टिंग अाॅपरेशन समोर अाणलं अाहे. मॅचचा निकाल बदलण्यासाठी तसंच एका सत्रावर वर्चस्व गाजविण्यासाठी क्युरेटर्सना, विद्यमान अाणि माजी क्रिकेटपटूंना कशाप्रकारे लाच दिली जाते, हे या स्टिंग अाॅपरेशनमध्ये दाखवलं अाहे. पाकिस्तानचा हसन रझा तसेच दिलहारा लोकुहेट्टिगे, जीवंता कुलातुंगे अाणि थारिंडू मेंडिस हे ३ क्रिकेटपटू स्पाॅट-फिक्सिंगमध्ये किंवा खेळपट्टीत छेडछाड केल्याप्रकरणी सहभागी अाहेत, हेही यात दाखवण्यात अालं अाहे.


'यांनी' केलं फिक्सिंग?

मॅचची प्रत्येक स्क्रिप्ट अाम्ही लिहिली होती. काय घडणार, हे अाम्हाला ठाऊक होतं, असं 'डी' कंपनीचे एक सदस्य अनिल मुनावार यांनी सांगितलं. तसंच मुंबईचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राॅबिन माॅरिस हा या अब्जावधी डाॅलरच्या मॅचफिक्सिंगमध्ये केंद्रस्थानी अाहे. वादग्रस्त अशा इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळलेल्या राॅबिन माॅरिसनं खेळाडू अाणि क्युरेटर्सना 'फिक्स' केलं अाहे. "अामच्याकडे ३० खेळाडू अाहेत, जे अाम्ही सांगू तेच करतात," असं माॅरिसनं म्हटलं अाहे.


अाॅस्ट्रेलियन, इंग्लंडच्या खेळाडूंचाही सहभाग

रांची येथील टेस्ट मॅचमध्ये अाॅस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंचा, तर चेन्नईतील सामन्यात इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा सहभाग असल्याचं या स्टिंग अाॅपरेशनमध्ये म्हटलं अाहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र अापल्यावरील अारोपांचं खंडन केलं अाहे. अाॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी याप्रकरणी प्रतिक्रिया देणंं टाळलं अाहे.


अाम्हाला मिळालेल्या मर्यादित माहितीच्या अाधारावर सदस्य बोर्ड अाणि भ्रष्टाचार विरोधी पथकासह अाम्ही या मॅचफिक्सिंगची चौकशी सुरू केली अाहे. क्रिकेटमधील मॅचफिक्सिंगसंदर्भातील सर्व पुरावे अाणि अन्य माहिती लवकरात लवकर सर्वांसमोर अाणावी, यासाठी अामच्याकडे सर्वांनीच तगादा लावला अाहे.
- अायसीसी


हेही वाचा -

पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांचं खळबळजनक स्टिंग, क्रिकेट जगत हादरलं

फिक्सिंगची सर्वाधिक गाजलेली 5 प्रकरणं...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा