Advertisement

पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांचं खळबळजनक स्टिंग, क्रिकेट जगत हादरलं


पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांचं खळबळजनक स्टिंग, क्रिकेट जगत हादरलं
SHARES

पिच फिक्सिंगचा स्टिंग उघडकीस आल्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगत हादरले आहे. कारण पिचची देखरेख करणारे (पिच क्युरेटर) पांडुरंग साळगावकर यांचे खळबळजनक स्टिंग एका खासगी वृत्त वाहिनीने उघडकीस आणले आहे. त्यामुळे बुधवारी पुणे येथे भारत-न्यूझीलंडदरम्यान होणारा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हा सामना होणार असल्याचे बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी स्पष्ट केले आहे.


दोषींवर कारवाई करू - बीसीसीआय

फलंदाजीसाठी उत्तम पीच तयार होण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख या स्टिंगमध्ये करण्यात आला आहे. याची माहिती मिळताच बीसीसीआयने चौकशीची घोषणा करत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.


काय म्हणतोय पिच क्यूरेटर?

या स्टिंग ऑपरेशनमध्ये पत्रकार मैदानाची देखरेख करणाऱ्या म्हणजेच पिच क्युरेटरला दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये थोडक्यात बदल करायला सांगतो. पत्रकाराने असे म्हणताच तो पिचक्युरेटर असे करायला लगेच तयार झाला. साळगावकर पुढे म्हणाला ३३७ धावा आरामत निघतील असा पिच तयार केला आहे. फलंदाजांना ही धावसंख्या पूर्ण करणे सहज शक्य होईल.


काय आहे क्रिकेट खेळाचा नियम

  • सामना सुरू होण्यापूर्वी कोणालाही पिच दाखवता येत नाही
  • फक्त प्रशिक्षक, कर्णधारालाच पिच दाखवले जाते
  • तरीही पत्रकाराला पिचवर जाण्याची परवानगी दिली


कसा आहे पुण्यातील हा पिच?

  • बॉलिंगसाठी चांगला पिच
  • बॉलरला फायदा करून देणारा पिच
  • विशेष म्हणजे फिरकी गोलंदाजांसाठी उत्तम पिच



हेही वाचा

फिक्सिंगची सर्वाधिक गाजलेली 5 प्रकरणं...


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा