Advertisement

१० विकेट राखून मुंबईचा विजय, अर्जुनच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी हतबल


१० विकेट राखून मुंबईचा विजय, अर्जुनच्या गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी हतबल
SHARES

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने विनू मंकड (१९ वर्षांखालील) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करून मुंबई संघाला आसामविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. अर्जुनने या सामन्यात ७ षटकांत १४ धावा देऊन ३ विकेट घेतल्या.

या सामन्यात आसाम संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी अर्जुननं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दानिश अहमद, ऋषिकेश बोरा आणि ऋतुराज विश्वास यांना बाद केलं. आसामचा संपूर्ण संघ अवघ्या ९९ धावांवर बाद झाला. मुंबईसमोर आसामनं १०० धावांच लक्ष्य ठेवलं होते.

मुंबईने हे लक्ष्य २१.५ षटकांत पार केलं. यशस्वी जैस्वाल नाबाद-५६ आणि सुवेद नाबाद-४१ यांनी मुंबईला १० विकेट राखून विजय मिळवून दिला.



हेही वाचा-

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा