Advertisement

चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी अजिंक्य, रोहित शर्माची निवड


चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी अजिंक्य, रोहित शर्माची निवड
SHARES

क्रिकेटच्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे अखेर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संघ निवडीच्या मुदतीनंतर अखेर 13 दिवसांनी मुहूर्त निघाला आणि संघाची घोषणा करण्यात आली. ही चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा इंग्लंड येथे 1 ते 8 जूनपर्यंत रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे.


https://twitter.com/hashtag/CT?src=hash">#CT https://twitter.com/hashtag/TeamIndia?src=hash">#TeamIndia - Virat (C), Shikhar, Rohit, Rahane, MSD (wk), Yuvraj, Kedar, Hardik, Ashwin, Jadeja, Shami, Umesh, Bhuvi, Bumrah & Manish https://t.co/pQOgpO9JNf">pic.twitter.com/pQOgpO9JNf

— BCCI (@BCCI) https://twitter.com/BCCI/status/861471372572151809">May 8, 2017या स्पर्धेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, युवराज सिंग, रवीचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मनीष पांडे या खेळाडूंची निवड सोमवारी वरिष्ठ निवड समितीकडून करण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा