Advertisement

आयपीएलचे उरलेले सामने यूएईमध्ये, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर

आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आयपीएलचे उरलेले सामने यूएईमध्ये, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर
SHARES

कोरोनामुळे आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित करावा लागला होता. आयपीएलचे ३१ सामने शिल्लक होते. मात्र, आता बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार उर्वरित सर्व सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे

आयपीएलचे उरलेले सामने यूएईमध्ये होणार आहेत. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू झाल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत होते. अनेक संघातील खेळाडूंनाही कोरोनाची  लागण झाली होती. त्यामुळे हा हंगाम ४ मे रोजी स्थगित करण्यात आला होता. २९ सामने खेळले गेले होते.

आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

कोलकाता नाइटराइडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता आणि बंगळुरु दरम्यान होणार सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर कोलकाताच्या सामन्यानंतर दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात आला होता. तर चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याचाही समावेश होतो. संपूर्ण संघ त्याच्या संपर्कात होता. त्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत उरलेले सामने होतील. १३ सामने दुबईत, १० सामने शारजात आणि ८ सामने अबुधाबीत होतील. सात दिवशी डबल हेडर असतील म्हणजे एकाच दिवशी दोन मॅच होतील. 

शेवटचा लीग सामना ८ ऑक्टोबर २०२१ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत होईल. यानंतर १० ऑक्टोबरला पहिली क्वालिफायर, ११ ऑक्टोबरला एलिमिनेटर आणि १३ ऑक्टोबरला दुसरी क्वालिफायर होईल. एलिमिनेटर आणि दुसरी क्वालिफायर शारजात होईल तर पहिली क्वालिफायर आणि आयपीएलचा अंतिम सामना दुबईत होईल. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा