Advertisement

पुलवामा हल्ला : विराटनं केला पुरस्कार सोहळा स्थगित

पुलवामामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विराट कोहलीनेही पुरस्कार सोहळा स्थगित करत अप्रत्यक्षरीत्या या घटनेचा निषेध नोंदवला आहे

पुलवामा हल्ला : विराटनं केला पुरस्कार सोहळा स्थगित
SHARES

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहिद झाले. या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. या निषेधार्ह घटनेची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुरस्कार सोहळा स्थगित केला आहे.


पुरस्कार सोहळा स्थगित

पुलवामामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विराट कोहलीनेही पुरस्कार सोहळा स्थगित करत अप्रत्यक्षरीत्या या घटनेचा निषेध नोंदवला आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे RP-SG Indian Sports Honours (भारतीय क्रीडा सन्मान) हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. स्वत: कोहलीनं ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

RP-SG indian sports honours हा पुरस्कार सोहळा शनिवारी आयोजित करण्यात येणार होता. मात्र, देशावर शोककळा पसरली असताना सोहळा आयोजित करणं योग्य नाही. त्यामुळं आम्ही हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आम्ही या कठीण प्रसंगी जवानांसोबत असल्याचं विराटनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


पुरस्कारांचं दुसरं वर्ष

या पुरस्कारांची सुरुवात मागच्या वर्षापासून करण्यात आली होती. RP-SG Indian Sports Honours या पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताचा भरवशाचा फलंदाज चेतश्वर पुजारा, महिला बॉक्सर मेरी कॉम आणि भारतातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येईल असं समजतं.हेही वाचा -

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ प्रवाशांचा रेल रोकोRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement