Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार

टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार
SHARES

टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) जाणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) दिली आहे. तसेच या दरम्यान गांगुलीने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

'टीम इंडियाला जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्याच्या दृष्टीनं विचार सुरु आहेत. या दौऱ्यात विराट सेना वनडे आणि टी २० सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत ३ तर टी २० मालिकेत ५ सामने खेळण्यात येणार आहेत. मात्र याबाबतचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. यामुळे खेळाडूंना त्रास होईल. टीम इंडियाचा हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ नंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी असणार आहे', अशी माहिती गांगुलीनं दिली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना १८-२२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच या २ स्पर्धांदरम्यान १२ दिवसांचा अंतर आहे. त्यामुळे जरी या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी या कालावधीत हे सामने खेळवले जाऊ शकतात. कारण त्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान भारताला इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळायची आहे. असे झाल्यास टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपचा अंतिम सामना संपवून श्रीलंकेला रवाना व्हावं लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा