Advertisement

खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून मिताली राज, आर. आश्विनची शिफारस

भारतासाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार दिला जातो. त्यासाठी ठराविक वेळी केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली जाते.

खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयकडून मिताली राज, आर. आश्विनची शिफारस
SHARES

भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सुचविली आहेत. 

भारतासाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार दिला जातो. त्यासाठी ठराविक वेळी केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली जाते. अर्जुन पुरस्कारासाठी तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सुचविली आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह, के एल राहुल आणि शिखर धवन यांच्या नावांचा समावेश आहे.

२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केलं जाणार आहे. खेल आणि युवा कल्याण मंत्रालयाद्वारा पुरस्कारांसाठी नामांकन पोहोचवण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. दरम्यान, मंत्रालयाने क्रिकेटसह हॉकी इंडियाकडून गोलकीपर पीआर श्रीजेशचे नाव खेल रत्न आणि हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तर भारतीय एथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी सुचवले आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा