Advertisement

भुवी दुखापतग्रस्त, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळालं संघात स्थान

भारताचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरऐवजी मुंबईतल्या खेळाडूला संधी देण्याचं ठरवलं आहे.

भुवी दुखापतग्रस्त, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळालं संघात स्थान
SHARES

भारताचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरऐवजी मुंबईतल्या खेळाडूला संधी देण्याचं ठरवलं आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान येत्या रविवार (१५ डिसेंबर) पासून वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधीच भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. त्याला हार्नियाचा त्रास होत असल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नाही.

त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)ने भुवीच्या दुखापतीसंदर्भात एक पत्रक काढलं आहे. या पत्रकानुसार भुवनेश्वरच्या जागी मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा