Advertisement

कृणाल पंड्यासह ८ खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू कृणाल पंड्या याला मंगळवारी (२७ जुलै) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मंगळवारीच होणारा टी २० सामना रद्द करण्यात आला होता.

कृणाल पंड्यासह ८ खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह
SHARES

सध्या भारतीय किक्रेट संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू कृणाल पंड्या याला मंगळवारी (२७ जुलै) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मंगळवारीच होणारा टी २० सामना रद्द करण्यात आला होता. कृणालच्या संपर्कातील आठ खेळाडूंनादेखील क्वारंटाईन केलं गेलं होतं.

मात्र, आता कृणालसह इतर सर्व सदस्यांची आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील दुसरा टी २० सामना बुधवारी खेळला जाईल असे सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी २० सामना २७ जुलैऐवजी २८ जुलै रोजी खेळला जाईल. मंगळवारी सामन्याअगोदर सर्व खेळाडूंची अँटीजन चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कृणाल पंड्या सकारात्मक आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील आठ खेळाडूंनाही ल क्वारंटाईन केलं होतं. आता या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी केली असून ती नकारात्मक आली आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने सलग दिवशी खेळले जातील.

 कृणाल ३० जुलै रोजी भारतीय संघासह मायदेशी रवाना होणार नाही. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर आणि अखेरची आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक येईपर्यंत त्याला श्रीलंकेत रहावे लागेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा