Advertisement

कोरोनाविरोधातील लढाईत सचिन तेंडुलकरचा 'मास्टर स्ट्रोक'

कोरोनाविरोधातील लढाईत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी पुढाकार घेतला आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत सचिन तेंडुलकरचा 'मास्टर स्ट्रोक'
SHARES

कोरोना व्हायरसचा देशातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ हजार ५४७ च्या घरात गेला आहे. त्यापेकी मुंबईत कोरोनाचे १ हजार ००८ रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. काही राज्यांनी हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. या परिस्थितीत अनेक कलाकार, खेळाडू आणि व्यवसायिक मदत करत आहेत.

कोरोनाविरोधातील लढाईत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर मदतीसाठी पुन्हा एकदा सरसावला आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांची गैरसोय झाली आहे. अशा लोकांना अपनालय मदत करत आहे. या खासगी संस्थेनं एका महिन्यात जवळपास ५००० लोकांना रेशन देण्याची जबाबदारी घेतली आहे. सचिननं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, संस्था जे काम करत आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा. त्याचं काम असंच सुरू राहावं.

सचिननं केलेल्या मदतीबद्दल अपनालय या खासगी संस्थेनं ट्विट केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं आहे. अपनालय संस्थेनंसुद्धा ट्विट केलं की,"मदतीबद्दल सचिन तेंडुलकरचे आभार"

यापूर्वी सचिननं ५० लाख रुपयांची मदत केली होती. कोरोनाच्या लढाईसाठी मदत केल्यानंतर सचिननं ट्वीट करून इतरांनाही यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. 

आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी मदत केली आहे. यामध्ये इरफान पठाण, यूसुफ पठाण, सौरव गांगुली यांनीही मदत केली आहे. याशिवाय बॉलिवूड कलाकार आणि व्यवसायक देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा