खेळातून महिलांना विशेष प्रोत्साहन

 Kandivali
खेळातून महिलांना विशेष प्रोत्साहन

कांदिवली - समतानगर क्रीडा संकुल मैदानात अय्यर कॉमर्स क्लासेसच्या वतीने अय्यर प्रिमिअर लीग क्रिकेटचं आयोजन करण्यात आलंय. या लीगमध्ये वेगवेगळ्या 15 संघांनी सहभाग घेतलाय. प्रत्येक पुरुषांच्या संघात 2 महिला खेळाडूंचा समावेश, हे या लीगचं वैशिष्ट्य. क्रिकेटमध्ये प्रथम महिलांना बॅटींग आणि बॉलिंग करण्याचा मान मिळाला. गेली 2 वर्ष ही स्पर्धा खास महिलांसाठी आयोजित करण्यात येतेय. तर या लीगमध्ये मुलींना प्रोत्साहन देण्याचं काम या स्पर्धेद्वारे आम्ही करत असल्याचं मुख्याध्यापक रामनाथ अय्यर यांनी सांगितलं.

Loading Comments