Advertisement

विराट अजूनही कर्णधार कसा? सुनील गावस्कर यांचा निवड समितीला प्रश्न

कर्णधार म्हणून कोहलीची नेमणूक केवळ वर्ल्डकपपर्यंतच होती. त्यामुळे वर्ल्डकप झाल्यानंतर कर्णधारपदाच्या फेरनिवडीसाठी औपचारिक बैठक व्हायला हवी होती, असं म्हणत गावस्कर यांनी बीसीसीआयच्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावरही निशाणा साधला.

विराट अजूनही कर्णधार कसा? सुनील गावस्कर यांचा निवड समितीला प्रश्न
SHARES

टीम इंडियाला वर्ल्डकपच्या (World Cup 2019) सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतरही विराट कोहली (Virat Kohli) अजून टीम इंडियाचा कर्णधार (Indian cricket team captain) कसा? असा प्रश्न भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी उपस्थित केला आहे. कर्णधार म्हणून कोहलीची नेमणूक केवळ वर्ल्डकपपर्यंतच होती. त्यामुळे वर्ल्डकप झाल्यानंतर कर्णधारपदाच्या फेरनिवडीसाठी औपचारिक बैठक व्हायला हवी होती, असं म्हणत गावस्कर यांनी बीसीसीआयच्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावरही निशाणा साधला.  

टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज (West Indies cricket team) दौऱ्याआधी संघातील खेळाडूंच्या निवडीसोबतच निवड समितीने या संघाचा कर्णधार कोण असेल, हे ठरवण्यासाठीही बैठक घ्यायला हवी होती. कारण टीम इंडियाच्या वन डे (ODI) आणि टी २० मालिकेसाठी (T 20) वेगळा, तर कसोटीसाठी (Test match) वेगळा कर्णधार असेल, अशी चर्चा होती. पण तसं झालं नाही. निवड समितीने तिन्ही संघाचं कर्णधारपद कोहलीकडे कायम ठेवलं. यावरून कोहली स्वत: च्या मर्जीने कर्णधार झालाय की निवड समितीच्या, असा प्रश्न उपस्थित होतो, असंही गावस्कर म्हणाले.

सोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) प्रशासक समितीनेही (COA) वर्ल्ड कपमधील भारताच्या कामगिरीचा आढावा घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे. हा सर्व सावळागोंधळ असल्याचंही गावस्कर यांचं म्हणणं आहे.हेही वाचा-

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात

रोहीत आणि माझ्यात ‘आॅल इज वेल’- विराट कोहलीRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा