Advertisement

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरुवात
SHARES

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळं कसोटी क्रिकेटला नवचैतन्य मिळणार असून स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळं जगभरातील क्रिकेटप्रेमींना एका नवी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

कसोटी क्रिकेटकडं दुर्लक्ष

टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमुळं कसोटी क्रिकेटकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सर्व स्तरातून होत होता. त्यामुळं कसोटी क्रिकेटमधील थरार टिकून राहावा आणि नव्या पिढीतील क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटमध्ये रस वाटावा, यासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (Test Championship) खेळवण्यात येत आहे.

अशी रंगणार स्पर्धा

  • ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपासून या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
  • पुढील २ वर्षांतील सर्व कसोटी मालिका या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहेत.
  • या स्पर्धेमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका अशा ३१ मार्च, २०१८ रोजी जागतिक क्रमवारीत पहिल्या ९ स्थानांवर असलेल्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
  • स्पर्धेत २७ मालिकांमधील ७१ सामन्यांचा समावेश आहे.
  • प्रत्येक संघाच्या वाट्याला स्पर्धेत एकूण ६ कसोटी मालिका खेळायला मिळणार आहे.
  • ६ मालिकांपैकी मायदेशात ३ तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात ३ मालिका खेळल्या जाणार आहेत.
  • प्रत्येक विजय, बरोबरी किंवा अनिर्णित सामन्याचे गुण मिळणार आहेत.
  • पराभूत संघाला मात्र गुण दिले जाणार नाहीत.
  • २ अव्वल संघांमध्ये इंग्लंड इथं जून १० ते १४ जून २०२१ मध्ये अंतिम सामना रंगणार आहे.



हेही वाचा -

मुंबई घाण करणाऱ्यांवर पोलिस नोंदवणार गुन्हे

कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा