कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक

एका नागरिकानं कुत्र्याला अमानुष मारतानाचा व्हिडिओ मोबाइलवर शुट केला. याबाबत त्याने बॉम्ब ऍनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांना पाठवला.

SHARE
मुंबईच्या वरळी परिसरात रस्त्यावर पावसात आडोसा घेण्यासाठी इमारतीत शिरलेल्या कुत्र्याला २ सुरक्षा रक्षकांनी गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणीची बॉम्ब ऍनिमल राईट्स या सामाजिक संस्थेकडून गंभीर दखल घेत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे.


अमानुष मारहाण

वरळी येथील नेहरू तारांगणजवळील एका उच्चभ्रू इमारतीत जवाहर जैस्वाल आणि शंकर यादव हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. २१ ते २४ जुलैदरम्यान या इमारतीच्या परिसरात जोरदार पावसामुळं कुत्र्याचं पिल्लू आडोसाला उभं होतं. त्यावेळी या दोघांनी त्या पिल्लाला काठीनं अमानुष मारहाण केली. त्याचवेळी एका रहिवाशानं कुत्र्याला अमानुष मारतानाचा व्हिडिओ मोबाइलवर शुट केला. तसंच, त्यानं बॉम्ब ऍनिमल राईट्सचे संस्थापक विजय मोहानी यांना पाठवला.


जामीनावर मुक्तता

या प्रकरणी विजय यांनी वरळी पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४३९, ३४ आणि द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल ऍक्टच्या कलम ११ आणि १ (अ) अन्वये गुन्हा नोंदवल. या दोघांनी केलेल्या मारहाणीत कुत्र्याच्या पिल्लाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर प्राणी रुग्णालयात अतिदक्षता विभात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरळी पोलिसंनी दोघांना अटक केली असून, न्यायालयानं या दोघांची जामीनावर मुक्तता केली आहे.हेही वाचा - 

लोकलच्या दिव्यांगांच्या डब्यातून गरोदर महिलांना करता येणार प्रवास

गोविंदा पथक आणि आयोजकांना परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलारसंबंधित विषय
ताज्या बातम्या