Advertisement

पुढील १२ महिने टीम इंडिया नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळं क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातवरण निर्माण झालं आहे.

पुढील १२ महिने टीम इंडिया नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार
SHARES

कोरोनामुळं यंदाच्या वर्षातील सर्व सामने रद्द करावे लागले. टी-२० वर्ल्ड कपपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द कराव्या लागल्या. पण, इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) झाली. अशातच आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळं क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातवरण निर्माण झालं आहे.

टीम इंडिया पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ टी-२० सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक टी-२० ( जून), आयसीसी वर्ल्ड कप (ऑक्टोबर) आणि आयपीएल २०२१ हे आहेच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया २ महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे.

नॉन स्टॉप खेळणार क्रिकेट 

  • इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ वन डे व ४ टी-२० सामने होणार आहे. 
  • मार्च ते मे या कालावधीत आयपीएल २०२१चे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 
  • आयपीएलनंतर भारत ३ वन डे व ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 
  • जून अखेरीस ते जुलै मध्यंतरापर्यंत श्रीलंकेतच आशिया चषक होणार आहे. 
  • जुलै महिन्यातच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 

झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन-डे सामने खेळणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बुधवारी त्याची अधिकृत घोषणा केली.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

  • ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज
  • १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, लॉर्ड्स
  • २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, इमेराल्ड हेडिंग्ले 
  • २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, किया ओव्हल
  • १० ते १४ सप्टेंबर- पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement