Advertisement

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
SHARES

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं आहे.

डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं.

सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आता त्याच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा