संदीप पाटलांच्या 'टेस्ट मॅच'साठी राहा तयार

 Mumbai
संदीप पाटलांच्या 'टेस्ट मॅच'साठी राहा तयार

मुंबई - विश्वचषक विजेते आणि नव्या पिढीच्या क्रिकेट खेळाडूंसाठी लवकरच क्रिकेटर संदीप पाटील यांचा कुकिंग शो येणार आहे. प्रत्येक खेळाडूला क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात रुची असतेच. जसं संजय मांजरेकर यांना गाण्याची कला अवगत आहे. तर कपिल देव यांना जेवण बनवण्याची आवड आहे. विशेष म्हणजे मासे हे मुंबईतल्या खेळाडूंचं आवडतं खाद्य आहे.

संदीप पाटील यांचा 'टेस्ट मॅच' हा शो अॅण्ड टीव्ही आणि लिव्हिंग फूड या चॅनलवर 8 एप्रिलपासून दाखवला जाणार आहे. या शोमध्ये क्रिकेटर कपिल देव, सुनील गावस्कर, क्रिष्णम्माचारी श्रीकांत, शिखर धवन आणि महिला क्रिकेट खेळाडूंमध्ये मिथाली राज, झुलन गोस्वामी दिसणार आहेत. या शोमध्ये क्रिकेटच्या किश्शांसोबतच विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेता येणार आहेत.

Loading Comments