चॅम्पियन्स ट्रॉफी आता गुगल डुडलवर देखील!

 Mumbai
चॅम्पियन्स ट्रॉफी आता गुगल डुडलवर देखील!
Mumbai  -  

जगभरातल्या लोकप्रिय क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेटचा क्रमांक बराच वरचा आहे. अाबालवृद्धांमध्ये या खेळाचे आकर्षण आहे. नुकतंच आयपीएल टी 20 चं दहावं पर्व संपलं आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. एकूण आठ देशांचे संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गुगलने देखील क्रिकेट चाहत्यांसाठी एक नवी शक्कल लढवली आहे. 

एखादा सण असो किंवा महान व्यक्तीचा जन्म दिवस, गुगल आपल्या डुडलच्या माध्यमातून अशा विशेष प्रसंगांची दखल घेतं. गुगलने चॅम्पियन ट्रॉफीचं डुडल तसंच विरंगुळा म्हणून खेळण्यासाठी गेमदेखील उपलब्ध केला आहे. गुगलचे डुडल पाहण्यासाठी आणि नवा गेम खेळण्यासाठीसुद्धा सध्या क्रिकेटप्रेमी गुगलच्या होम पेजला भेट देत आहेत.

Loading Comments