Advertisement

वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
SHARES

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी त्यांच्या परिवारासह भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकरचा हा 22 फुटांचा पुतळा मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर बांधला असून आंतरराष्ट्रीय शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी त्याची निर्मिती केली आहे.हेही वाचा

मुंबईत पालिका ऑलिम्पिक स्टेडियम उभारणार

"आचरेकर सर मला प्रविणची बॅटिंग दाखवायचे", सचिनकडून कौतुक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा