Advertisement

T-20 विश्वचषकाचं आयोजन ICCनं ढकललं पुढं

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे.

T-20 विश्वचषकाचं आयोजन ICCनं ढकललं पुढं
SHARES

जीवघेण्या कोरोनाचा क्रिकेट विश्वाला चांगलाच फटका बसला आहे. कोरोनामुळं भारताच्या दौऱ्यांपासून अनेक क्रिकेट सामने रद्द करण्यात आले असून, आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे.

आयसीसीनं यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा केली आहे. मागील २ महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला.

ऑस्ट्रेलियन सरकारनं काही महिन्यांपूर्वी नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू, रुग्णांची संख्या वाढताच सरकारनं परत लॉकडाउन घोषित केलं आहे. परंतू देशातली एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.

२०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाणार असल्याची माहिती आयसीसीनं जाहीर केली. तसंच, टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या १३व्या हंगामाचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १३व्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, फक्त आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा जाहीर करण्याची वाट बीसीसीआयला पहायची होती.



हेही वाचा -

मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा