Advertisement

T20 World Cup Schedule : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

T20 World Cup Schedule : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली
SHARES

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती. पण गटवारीनुसार भारत-पाकिस्तान हे आमने-सामने भिडणार असल्यानं यांच्यातील सामाना कधी होणार आहे, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली होती. मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून, आयसीसीनं भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख निश्चित केली आहे.

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात ८ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल २ संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे २ गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ ५ सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. 

सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी २ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

पात्रता फेरीत सहभागी संघ

गट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया

गट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

पात्रता फेरीचं वेळापत्रक

  • १७ ऑक्टोबर - ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड
  • १८ ऑक्टोबर - आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया
  • १९ ऑक्टोबर - स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश
  • २० ऑक्टोबर - नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड
  • २१ ऑक्टोबर - बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि.  स्कॉटलंड
  • २२ ऑक्टोबर - नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स

सुपर १२ फेरीतील संघ

गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.

गट २ - भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर १२ चे वेळापत्रक

ग्रुप १ 

  • २३ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
  • २३ ऑक्टोबर - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता
  • २४ ऑक्टोबर - अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी ३.३० वाजता
  • २४ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
  • २७ ऑक्टोबर - इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २९ ऑक्टोबर - वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ  दुपारी ३.३० वाजता
  • ३० ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ - दुपारी ३.३० वाजता
  • ३० ऑक्टोबर - इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
  • १ नोव्हेंबर - इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
  • २ नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता
  • ४ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी ३.३० वाजता
  • ४ नोव्हेंबर - वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ६ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी ३.३० वाजता

 ग्रुप २

  • २४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २५ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
  • २६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
  • २७ ऑक्टोबर - ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • २ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
  • ३ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी ३.३० वाजता
  • ३ नोव्हेंबर - भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ५ नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
  • ७ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार ३.३० वाजता
  • ७ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
  • ८ नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता


  • उपांत्य फेरीचे सामने  -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर
  • अंतिम सामना - १४ नोव्हेंबर
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा