SHARE

श्रीलंका विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेट संघानं दमदार विजय मिळवला. या विजयानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय समाने खेळविण्यात येणार आहेत. याच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या समान्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला सामना १४ जानेवारी रोजी मुंबईत त्यानंतर १७ व १९ जानेवारी रोजी अनुक्रमे राजकोट व बंगळूरू इथं खेळणार आहे. दरम्यान, श्रीलंके विरुद्धची टी-२० मालिका जिंकत भारतानं नववर्षाची सुरूवात विजयानं केली. त्यामुळं भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचाही पराभव करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.हेही वाचा -

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; रोहितचं पुनरागमन

कुठल्याही परिस्थितीत वाडिया रुग्णालय बंद होऊ देणार नाही – शर्मिला ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या