Advertisement

रिषभ पंतच्या शतकाने डाव सावरला, दुसऱ्या दिवसअखेर भारत ७ बाद २९४

भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने इंग्लंडवर ८९ धावांची आघाडी मिळवली आहे.

रिषभ पंतच्या शतकाने डाव सावरला, दुसऱ्या दिवसअखेर भारत ७ बाद २९४
SHARES

भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने इंग्लंडवर ८९ धावांची आघाडी मिळवली आहे. 

भारताचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर रिषभ पंत टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. त्याने ११७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकलं. मात्र, अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रिषभ पंत झेलबाद झाला. रिषभ पंत बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं अक्षर पटेलला हाताशी धरून धावफलक हलता ठेवला. 

११७ चेंडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपलं अर्धशतक  पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारतानं ७ बाद २९४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताकडे ८९ धावांची आघाडी आली आहे. वॉशिंग्टन सुंदर नाबाद ६० तर अक्षर पटेल नाबाद ११ धावांवर खेळत आहेत.

पहिल्या दिवसी इंग्लंडचा संघ अवघ्या २०० धावांवर गारद झाला.पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब होती. पहिल्या षटकातील तिसर्‍या बॉलवर शुभमन खाते न उघडता बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला एलबीडब्ल्यू केले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एका गडी बाद २४ धावा झाल्या होत्या.  कालच्या धावसंख्येमध्ये फक्त १६ धावांची भर घालून पुजारा १७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला.

अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २७ धावांवर अजिंक्य रहाणेला अँडरसन बाद केले. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणाऱ्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचं वाटत असतानाच रोहित शर्मा वैयक्तिक ४९ धावसंख्येवर पायचीत झाला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा