Advertisement

IND vs ENG : तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IND vs ENG : तिसरा एकदिवसीय सामना मुंबईत होणार?
SHARES

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २८ मार्च रोजीचा अखेरचा सामना पुण्याहून मुंबईत स्थलांतरित करण्याबाबत भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभिर्यानं विचार करत आहे. इंग्लंडच्या संघाला मायदेशी रवाना होण्यास सोपं जावं, या उद्देशानं हा सामना मुंबई खेळवण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार असून, महाराष्ट्र क्रिकट संघटना सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचं आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे. हे सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत.

या मालिकेसाठी ३ मुख्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सामना स्वतंत्र खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असल्याचं समजतं. स्टेडियममध्ये किती टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळेल, याबाबतचा निर्णय मार्च महिन्यातच होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार आणि निर्णयानंतरच स्टेडिअमचे तिकीट शुल्क आणि त्याची आसनक्षमता याचा अंदाज घेऊन त्याविषयीची घोषणा करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा