‘असा’ विक्रम करणारा भारताचा 'हा' गोलंदाज जगातील पहिला खेळाडू


  • ‘असा’ विक्रम करणारा भारताचा 'हा' गोलंदाज जगातील पहिला खेळाडू
SHARE

भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. भारताचा जलद गोलंदाज दीपक चहरनं घेतलेल्या हॅट्रिकच्या जोरावर भारतानं सामना जिंकला. तसंच, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळं भारतानं बांग्लादेश समोर १७५ धावांचं आव्हान ठेवले होते.

६ विकेट

भारतानं ठेवलेल्या १७५ धावांच्या या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरनं ६ विकेट घेतल्या. दीपकनं त्याच्या ३.२ षटकांमध्ये केवळ ७ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत. तसंच, अखेरच्या षटकाच्या पहिल्या २ चेंडुत त्यानं एक हॅट्रिक घेतली. त्याचसोबत त्यानं टी-२० इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. हा विक्रम १ धाव कमी देत दीपकनं आपल्या नावावर केला.

प्रथम फलंदाजी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी-२० अर्धशतक झळकावलं. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळं भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचं आव्हान ठेवलं.हेही वाचा -

स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोनसंबंधित विषय
ताज्या बातम्या