Advertisement

उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन

सत्तास्थापन करण्यासाठी भाजप असमर्थ ठरल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. मात्र शिवसेनेला ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीशिवाय मॅजिक फिगर गाठणे कठीण आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून राजकिय

उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन
SHARES

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटल्यानंतर ही सत्ता स्थापन झाले नाही. त्यानंतर आता शिवसेनेला राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण आल्याने हालचाली वेगाने वाढल्या आहेत. शिवसेनेसोबत सत्तेत बसून भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे जरी एकमत असले. तरी काँग्रेसच्या हायकमांडकडून अद्याप पाठिंबा देण्याबाबत हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आज सकाळी १० वाजता काँग्रेस पक्षाची बैठक दिल्लीत सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंत राव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांसोबत आमदारांची बैठक सुरू आहे.

अखेर ३० वर्षांची मैत्री सोडून शिवसेना भाजपला एकाकी पाडण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची उघड उघड मदत घेत आहे. शिवसेना ५०-५० फाॅर्म्युलावर अडून बसल्याने युतीत मिठाचा खडा पडला.  महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजपला शिवसेने शिवाय सत्तास्थापन करणे कठीण आहे. त्यामुळेच सत्तास्थापन करण्यासाठी भाजप असमर्थ ठरल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. मात्र शिवसेनेला ही  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीशिवाय मॅजिक फिगर गाठणे कठीण आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून राजकिय खलबतं सुरू आहेत.

पाठिंबा देण्यावर पक्षाचे प्रभारी मल्लिकाअर्जुन खर्गे यांनी राज्यात सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसची बैठक घेत आहेत. मात्र पक्षाचे हायकमांड काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहेच. तर दुसरीकडे मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि पक्षातील अन्य नेतेमंडळी उपस्थिती आहेत. पाठिंबा मिळण्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे बडे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चाकरत पाठींबा देण्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते.  त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणार का हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय