Advertisement

आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक

यंदा आयपीएल स्पर्धेचा थरार २३ मार्चपासून रंगणार आहे. मंगळवारी बीसीसीआयनं आयपीएलच्या पहिल्या १७ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं फक्त पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

आयपीएलच्या १७ सामन्यांचं वेळापत्रक
SHARES

दरवर्षाप्रमाणे क्रिकेटरसिकांना यंदाही इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) फीव्हर चढू लागला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल स्पर्धा कुठे खेळवली जाणार याबाबतही उत्सुकता होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत यंदा आयपीएल भारतातच होणार असल्याचं स्पष्ट करत सुरुवातीच्या सामन्यांचं वेळापत्रकही जाहिर करण्यात आलं आहे.


आयपीएलचं वेळापत्रक जाहीर

यंदा आयपीएल स्पर्धेचा थरार २३ मार्चपासून रंगणार आहे. मंगळवारी बीसीसीआयनं आयपीएलच्या पहिल्या १७ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं फक्त पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. लवकरच पुढील वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.


२३ मार्चला पहिला सामना

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २३ मार्च रोजी पहिला सामना आयपीएल २०१८ चा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना २४ मार्चला दिल्ली संघाशी होणार आहे. त्याचप्रमाणं, ८ ठिकाणी प्रत्येकी २ सामने होणार असून, दिल्लीमध्ये ३ सामने खेळवण्यात येतील. तसंच, आयपीएलची फायनलही चेन्नईमध्ये होणार आहे.



पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक टीम कमीत कमी चार सामने, तर दिल्ली आणि बंगळुरू प्रत्येकी पाच सामने खेळेल. दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर तीन आणि बंगळुरूचा संघ बाहेरील मैदानांवर तीन सामने खेळणार आहे. उरलेल्या टीम होम ग्राऊंडवर दोन आणि बाहेरच्या मैदानांवर प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत.



हेही वाचा -

अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून...



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा