Advertisement

राजस्थान विरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबई पराभूत

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाला समोर जावं लागलं होतं. मात्र, दुसऱ्या सामन्यातही राजस्थान गडी राखून मुंबईचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकॉक याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं १६२ धावांचे आव्हान राजस्थानपुढे ठेवलं होतं.

राजस्थान विरुद्धच्या दोन्ही सामन्यात मुंबई पराभूत
SHARES

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाला समोर जावं लागलं होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही राजस्थाननं ५ गडी राखून मुंबईचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर क्विंटन डिकॉक याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं १६२ धावांचं आव्हान राजस्थानपुढे ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि रियान पराग यांनी दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. स्टिव्ह स्मिथ यानं ४८ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकार मारत ५९ धावा केल्या. तसंच, रियान पराग यानं २९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकार मारत ४३ धावा केल्या.


प्रथम फलंदाजी 

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर फलंदाज डिकॉकनं संघाला चांगली सुरूवात करून देत अर्धशतकी खेळी केली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा लवकर माघारी परतला ७ चेंडूत ५ धावा केल्या, तर क्विंटन डिकॉक यानं ४७ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकार मारत ६५ धावा केल्या. त्यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या सुर्यकुमार याधवनं संघाचा डाव सावरला. त्यानं ३३ चेंडूत ३४ धावा केल्या. तसंच, हार्दिक पांड्या आणि बेन कटींग यानं चांगली फलंदाजी करत राजस्थानसमोर १६२ धावांच आव्हान ठेवलं.



गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. राजस्थानचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल यान २ विकेट्स घेतल्या, तर स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनादकट यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणं, या समान्यात मुंबईच्या गोलंदाजांना देखील सुरूवातील चांगली गोलंदाजी करता आली. मुंबईकडून राहुल चहरनं ३, जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतल्या.


राजस्थानचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडं

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ आयपीएलच्या १२ व्या हंगामात फक्त २ सामने जिंकला आहे. तसंच, गुणतालिकेतही राजस्थानचा संघ ७ व्या स्थानावर आहे. त्याशिवाय अजिंक्यला फलंदाजी देखील फारशी चांगली करता आली नाही. त्यामुळं संघाला नवीन दिशा देऊ शकेल अशा कर्णधाराची गरज असल्याचं संघ व्यवस्थापनानं स्पष्ट करत राजस्थान संघाच नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडं दिलं आहे.



हेही वाचा -

हार्दिक, राहुलला 'कॉफी' भोवली; लोकपालांकडून २० लाखांचा दंड

रणबीर बनला सुपरपॅावर असलेला डीजे!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा