Advertisement

विराटचं टेन्शन वाढलं, आरसीबीचा आणखी एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता आता वाढली आहे. आरसीबीच्या आणखी एका खेळाडूला आता कोरोनाची लागण झाली आहे.

विराटचं टेन्शन वाढलं, आरसीबीचा आणखी एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह
SHARES

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता आता वाढली आहे. आरसीबीच्या आणखी एका खेळाडूला आता कोरोनाची लागण झाली आहे. 

आरसीबीचा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता डॅनियल सॅमचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  सध्या डॅनियल विलगीकरणात आहे. ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरोधात आयपीएल २०२१ चा पहिला सामना खेळणार आहे. मात्र, या सामन्यापूर्व दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

आरसीबीने ट्विट करून म्हटलं की, डॅनियल सॅम्स चेन्नईत ३ एप्रिल रोजी पोहोचला. तेव्हा त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. मात्र ७ एप्रिलला त्याच्या दुसऱ्या चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सध्या कोणतीही लक्षणे नसून तो विलगीकरणात आहे. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत नितीष राणा, अक्षर पटेल, देवदत्त पडीक्कल आणि आता डॅनियल यांना कोरोनाची लागण झालली आहे. तसंच मंगळवारी मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक किरण मोरे यांनाही कोरोना लागण झाली होती. याशिवाय वानखेडे स्टेडियममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  आयपीएल सुरु होण्यापूर्वीच २० पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे



हेही वाचा -

IPL 2021 : वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफपैकी आणखी दोघांना कोरोना

व्हिडीओ : 'एक नारल दिलाय दर्या देवाला', गाण्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा