Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

व्हिडीओ : 'एक नारल दिलाय दर्या देवाला', गाण्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होणार आहे

व्हिडीओ : 'एक नारल दिलाय दर्या देवाला', गाण्यावर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होणार आहे. आयपीलएल सुरू होण्यापूर्वी व आयपीएल दरम्यान काही जाहीरातींचं चित्रकरण या खेळाडूंच्या मार्फत केली जाते. यावेळेस ही मुंबईच्या खेळाडूंनी नुकतंच विविध जाहिरातींचं शूट केलं. त्यादरम्यान त्यांनी, 'एक नारल दिला दर्या देवाला' या लोकप्रिय मराठी गाण्यावर डान्स केला. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर टाकलेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला रोहितनं ठेका धरला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव, बुमराह आणि पांड्या बंधूही डान्स करताना दिसले.

या डान्समुळं मुंबईच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू यांसारख्या खेळाडूंचा समावेश असून हे खेळाडू चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.

या सामन्यात रोहितने ६८ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. यंदा मुंबईचा संघ जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी उत्सुक आहे. यंदाच्या मोसमात सलामीच्या सामन्यात मुंबईसमोर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे.हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुकसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा