क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये आपल्याला नेहमी वादाचे खटके उडताना पाहायला मिळतात. हा वाद कधी खेळांडूमध्ये तर कधी खेळाडू आणि पंचांमध्ये होताना पाहायला मिळतं. पंरतू, 'स्पोर्टमनशीप' जी क्रिकेटसह प्रत्येक खेळात महत्वाची असते, ती मात्र आपल्याला फार कमीवेळा पाहायला मिळते. परंतू, मंगळवारी झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात ही 'स्पोर्टमनशीप' पाहायला मिळाली. ज्यामुळं चाहत्यांनी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच, पंजाब किंग्सचा संघाचा कर्णधार के.एल. राहूल यानं मैदानातच 'थम्ब्सअप' केलं.
— Simran (@CowCorner9) September 28, 2021
नेमकं झालं काय?
सामन्यातील सहाव्या षटकामध्ये एक विचित्र प्रकार घडला. कृणाल पंड्या गोलंदाजी करत असताना ख्रिस गेलने एक जोरदार फटका लगावला. मात्र हा चेंडू नॉन स्ट्राइक्स एण्डला असणाऱ्या के. एल. राहुलला लागला. चेंडू राहुलला लागून गोलंदाजी करणाऱ्या क्रृणालकडे गेला आणि क्रृणालने लगेच तो स्टम्पकडे ढकलत राहुलला धावबाद केल्याची अपील केली. मात्र एकीकडे चेंडू लागल्याने राहुलला वेदना होत असल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरोधात अपील करताना दिसलं. ही गोष्ट लक्षात येताच लगेच कृणालने त्याचं अपील मागे घेतलं. तसेच कर्णधारालाही इशारा करुन अपील करत तिसऱ्या पंचांपर्यंत न जाण्याचा निर्णय घेतला.
Spirt Of Cricket And Kl Rahul Quick To Give Rohit Sharma A Thumb Up 👍🏻@ImRo45 | #RohithSharma | #Cricket pic.twitter.com/le9KVKQZzP
— ROHIT TV (Rohit Sharma FC™ #RohitSharma #IPL2021 (@rohittv_45) September 28, 2021
मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पंड्याच्या एका कृतीनं चाहत्यांची मन जिंकली असून त्यांच्या खिळाडूवृत्तीला अनेकजण सलाम करताना दिसत आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सचा पराभव केला. या विजयासोबतच मुंबईच्या प्ले ऑफ्सच्या आशा कायम आहेत. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.