Advertisement

मुंबईच्या पराभवानंतर 'या' २ खेळाडूंना संघातून हाकलण्याची चाहत्यांची मागणी

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या समान्यात मुंबईचा पराभव झाला.

मुंबईच्या पराभवानंतर 'या' २ खेळाडूंना संघातून हाकलण्याची चाहत्यांची मागणी
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या समान्यात मुंबईचा पराभव झाला. या परभवानंतर मुंबईचे चाहते नाराज झाले असून संघातील काही खेळाडूंवर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात काही दिवसांतच टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होत असून, भारतीय संघात निवड झालेल्या दोन खेळाडूंना बाहेर काढा, अशी मागणीही चाहत्यांकडून होत आहे.

मुंबई इंडियन्स संघाच्या मधल्या फळीत खेळणारे खेळाडू ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी खराब झाली आहे. सूर्यकुमारच्या बॅटमधून अद्याप धडाकेबाज धावा पाहायला मिळाल्या नाहीत. त्यामुळं सूर्यकुमार आणि इशान या दोघांनाही सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोघांचीही टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळं त्यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असल्यानं त्यांना टार्गेट केलं जातंय. काहींनी तर विश्वचषक स्पर्धेतून यांना बाहेर करण्याचीही मागणी ट्विटरवरुन केली.

आयसीसीच्या नियमानुसार टीम मॅनेजमेंटला अद्यापही संघात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं, या दोन्ही खेळाडूंना संघातून बाहेर करत शिखर धवन आणि श्रेयश अय्यर यांना संघात संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

युएईमध्ये १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून, भारतानं १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्याही सध्या ट्रोल होत आहे. हार्दीकला गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. पण, आयपीएल सामन्यात त्याच्याकडून अद्याप गोलंदाजी करण्यात आली नाही. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा