Advertisement

राज्य कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, अनिल मुंढे यांना विजेतेपद


राज्य कॅरम स्पर्धेत काजल कुमारी, अनिल मुंढे यांना विजेतेपद
SHARES

शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे अायोजित दहाव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत मुंबईची अग्रमानांकित काजल कुमारी अाणि पुण्याच्या तिसऱ्या मानांकित अनिल मुंढे यांनी अनुक्रमे महिला अाणि पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. ७२० खेळाडूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत रंगतदार सामन्यांची अनुभूती चाहत्यांना घेता अाली. विजेत्यांना शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष अाणि माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे, मानद कार्यवाह संजीव खानोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात अाले.


काजलने अायेशा मोहम्मदला धूळ चारली

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित काजल कुमारीने दुसऱ्या मानांकित मुंबईच्याच अायेशा मोहम्मदचा फडशा पाडला. काजलने २५-१४, २५-८ असा पराभव करून अापले वर्चस्व सिद्ध केले अाणि ७५०० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी रंगलेल्या सामन्यात पालघरच्या मिताली पिंपळेने तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ठाण्याच्या मीनल लेलेचा १३-२५, २५-१६, २५-६ असा पाडाव केला.


अनिलला विजेतेपदासाठी संघर्ष

अंतिम फेरीत अनिल मुंढे यांना विजेतेपदासाठी फारच संघर्ष करावा लागला. त्यांना ठाण्याच्या बिगरमानांकित झहीद अहमदने चांगलेच झुंजवले. अखेर तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात अनिल मुंढे यांनी ११-२५, २५-१०, २५-१५ असा विजय मिळवून विजेतेपदावर नाव कोरले. त्यांना २१ हजार रुपये अाणि अाकर्षक चषक देऊन गौरविण्यात अाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा