Advertisement

किरण पोवारकडे एमसीएच्या फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा


किरण पोवारकडे एमसीएच्या फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा
SHARES

मुंबईचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू किरण पोवार याच्याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजी प्रशिक्षकाची धुरा सोपविण्यात अाली अाहे. त्यामुळे किरण पोवारच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या होतकरू फलंदाजांना होणार अाहे. भारताचा माजी अाॅफस्पिनर अाणि नुकताच मुंबईच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असलेला रमेश पोवार याचा किरण पोवार हा लहान भाऊ अाहे.



किरणची कारकीर्द

किरण पोवार याने ३९ प्रथम श्रेणी सामन्यांत मुंबईसह अासाम, बडोदा अाणि गोवा या छोट्या संघांचं प्रतिनिधित्वही केलं अाहे. १९९६-९७ ते २००६ या नऊ वर्षांच्या कालावधीत त्याने अाठ शतकांसह ४२ च्या सरासरीने २५६२ धावा फटकावल्या अाहेत. त्याचबरोबर त्याने १० विकेट्सही टिपल्या अाहेत. भारताच्या १९ वर्षांखालील संघांचं प्रतिनिधित्वही त्यानं केलं अाहे.


प्रशिक्षकपदाचा अनुभव

किरण याने मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले अाहे. त्याचबरोबर अन्य खेळाडूंनाही तो मार्गदर्शन करत असतो. त्याच्या अनुभवामुळेच किरणची एमसीएच्या क्रिकेट अकॅडमीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. नुकत्याच एमसीएच्या कार्यालयात झालेल्या सर्व वयोगटातील प्रशिक्षक अाणि क्रिकेट सुधार समितीच्या (सीअायसी) सदस्यांच्या बैठकीला तो उपस्थित होता.


हेही वाचा -

रमेश पोवारवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी

सर्फराझ खानला करायचीय मुंबई संघात घरवापसी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा