Advertisement

'सीएसके'च्या चाहत्यांना धक्का; महेंद्रसिंग धोनीने सोडलं कर्णधारपद

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अखेर चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडलं आहे.

'सीएसके'च्या चाहत्यांना धक्का; महेंद्रसिंग धोनीने सोडलं कर्णधारपद
SHARES

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने अखेर चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडलं आहे. तसंच, धोनीने रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नईचे कर्णधारपद सोपवलं आहे.

गुरूवारी दुपारी चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सीएसकेच्या फॅन्ससाठी नक्कीच धक्कादायक आहे. धोनी आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या टीमने आतापर्यंत ४ वेळा विजेतेपद मिळवलं आहे.

महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले आहे. जडेजा बराचकाळापासून चेन्नई संघात आहे. जडेजा हा 2012 पासून चेन्नई संघात खेळत आहे. चेन्नईचा कर्णधार होणारा जडेजा हा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी धोनी आणि त्यानंतर सुरेश रैनाने संघाचं कर्णधारपद सांभाळलं होतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा