Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

सीएसकेची यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सी, धोनीने केली लाँच

२००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे.

सीएसकेची यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सी, धोनीने केली लाँच
SHARES

चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये नवीन जर्सीत दिसणार आहेत. चेन्नईच्या जर्सीत एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईने भारतीय सशस्त्र दलाचा सन्मान करत जर्सीमध्ये कॅमोफ्लॉज जोडला आहे.

महेंद्रसिंग धोनीने नवीन जर्सीचं अनावरण केलं आहे. २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केला आहे. चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वर तीन स्टार आहेत. २०१०, २०११ आणि  २०१८ मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात. फ्रँचायझीने जर्सी अनावरण करतानाचा धोनीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे… तेच आपले खरे नायक आहेत.

 यंदाच्या आयपीएलला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर ३० मे रोजी फायनल खेळवली जाईल.  आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचची खराब कामगिरी राहिली होती.  चेन्नईचा संघ बाद फेरी गाठू शकला नाही. त्यांना ७ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता चेन्नईने चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे.  चेन्नईने सराव सत्राचे आयोजन करत खेळाडूंना एकत्रित केलं आहे.हेही वाचा -

  1. भारतीय संघ पुन्हा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार?

  1. श्रेयस अय्यरला दुखापत, वन डे मालिकेतून बाहेर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा