कल्पेश गोविंद कोळी क्रिकेट स्पर्धेत माटुंगा केंद्राची हाराकिरी

  Dadar (w)
  कल्पेश गोविंद कोळी क्रिकेट स्पर्धेत माटुंगा केंद्राची हाराकिरी
  मुंबई  -  

  27 व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत माटुंगा केंद्राने माहुला केंद्राला 155 धावांत गुडांळले. न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सामना माटुंगा जिमखाना येथे खेळवण्यात आला होता. माहुला केंद्राच्या गौरव कुमारने 40 धावा देत 3 गडी, तर हर्षल जाधवने 29 धावा देत 4 गडी बाद केले. विशेष म्हणजे या दोघांनी टिच्चून मारा करत प्रतिस्पर्धी संघास घाम फोडला. माहुला केंद्राने देखील तोडीस तोड उत्तर देत दिवस अखेर माटुंगा केंद्राचे 30 धावांत 4 गडी बाद केले. माटुंगा केंद्राच्या वैभव कांबळेने 3 धावांत 2 गडी तर अयाझ खानने 18 धावांत 2 गडी बाद केले. रविवारी अंतिम सामना होणार असून, कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.