Advertisement

रणजी क्रिकेटमध्ये मुंबईचा पहिला विजय


रणजी क्रिकेटमध्ये मुंबईचा पहिला विजय
SHARES

रणजी सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी ओडीसाचा 120 धावांनी पराभव करत या मोसमातील पहिला विजय मिळवला.  413 धावांच्या आव्हानाचे पाठलाग करत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी ओडीसा संघाला 292 धावांमध्ये गुंडाळून तंबूत माघारी पाठवले. या रोमांचाक लढतीत सिद्धेश लाडच्या शतकामुळे मुंबईला विजय मिळवणे सोयीस्कर ठरले. या पहिल्या डावात शतक ठोकलेल्या पृथ्वी शॉची सामनावीर म्हणून निवड झाली. हा सामना भुवनेश्वर येथे केआयआयटी मैदानवर खेळवण्यात आला.


पहिल्या डावात मुंबईची शानदार खेळी

मुंबईला रणजी सामन्यात प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर मुंबईने पहिल्या डावात शानदार खेळी केली, तर पृथ्वी शॉच्या शतकामुळे देखील मुंबईला 289 धावांचा डोगर रचता आला. दुसऱ्या डावात 6 बाद 85 धावा करत मुंबईच्या सिद्धेशने 153 चेंडूत 117 धावांची निर्णायक खेळी केली. तर मुंबईने दुसरा डाव 9 गडी बाद 268 धावांवर आणला आणि ओडीसाला विजयासाठी 413 धावांचे आवाहन दिले.

मुंबईने तिसऱ्या दिवशी 4 बाद 93 धावा करत विजयावर शिक्का मोर्तब केला. तर दुसऱ्या डावात ओडीसाला धक्का देत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवत दबदबा निर्माण केला. मुंबई संघाच्या शार्दूल ठाकुर, आकाश पारकर आणि धवल कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघ दबावाखाली होता. तर 4 बाद 93 धावसंख्येवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ओडीसाने 199 धावा करत बाद झाले. यामध्ये धवल आणि आकाशने प्रत्येकी 3 बळी घेतले तर, अभिषेक नायरने 2 बळी घेतले. मुंबईच्या या विजयमामुळे क गटात 10 गुणांसह तिसऱ्या स्थानी मजल मारली आहे.


संक्षिप्त धावफलक :

  • मुंबई (पहिला डाव) : ९९.५ षटकात सर्वबाद २८९ धावा
  • ओडिसा (पहिला डाव) : ५०.५ षटकात सर्वबाद १४५ धावा
  • मुंबई (दुसरा डाव) : ७१ षटकात ९ बाद २६८ धावा (घोषित)
  • ओडिसा (दुसरा डाव) : ८५.१ षटकात सर्वबाद २९२ धावा 
  • (गोविंदा पोद्दार ८७, शांतनू मिश्रा ४९; आकाश पारकर ३/४०, धवल कुलकर्णी ३/७४; अभिषेक नायर २/३५.)
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा