Advertisement

IPL लिलाव: मुंबई इंडियन्सकडं बोलीसाठी सर्वात कमी पैसे

मागील वर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाकडं सर्वात कमी पैसा शिल्लक राहिला असल्याचं समोर आलं आहे. तर लिलावात बोली लावण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक पैसा आहे.

IPL लिलाव:  मुंबई इंडियन्सकडं बोलीसाठी सर्वात कमी पैसे
SHARES

२०२० मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी कोलकाता येथे १९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. या लिलावासाठी मागील वर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाकडं सर्वात कमी पैसा शिल्लक राहिला असल्याचं समोर आलं आहे. तर लिलावात बोली लावण्यासाठी  किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक पैसा आहे. 

आयपीएल लिलावासाठी बीसीसीआयने ३३२ खेळाडूंना शॉटलिस्ट केले आहे. यापैकी ७३ खेळाडूंना पुढील वर्षी खेळण्याची संधी मिळणार आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या ३३२ खेळाडूंवर ८ संघ मालक बोली लावणार आहेत. मुंबई संघाने सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. पण या संघाकडे बोली लावण्यासाठी अवघे १३.०५ कोटी रुपये आहेत. तर स्पर्धेचे एकदाही विजेतेपद न मिळवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबकडे बोलीसाठी सर्वाधिक ४२.७० कोटी रुपये आहेत. अभिनेत्री प्रिती झिंटा ही पंजाब संघाची सहमालकीण आहे. 

 पंजाब संघ नऊ खेळाडूंना बोली लावू शकतो. या नऊ पैकी चार खेळाडू परदेशी असू शकतील. मुंबई संघ ७ खेळाडूंवर बोलू लावू शकतो. यात दोन परदेशी खेळाडूंना विकत घेता येऊ शकले. पंजाब पाठोपाठ सुपरस्टार शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. कोलकाताकडे ३५.६५ कोटी रुपये शिल्लक असून या संघाला ११ खेळाडूंना विकत घेता येणार आहे. त्यात चार परदेशी खेळाडू असतील

आयपीएल  संघ                                                    शिल्लक रक्कम 

१) पंजाब (Kings XI Punjab)                                ४२.७० कोटी रु.
२) कोलकाता (Kolkata Knight Riders)                ३५.६५ कोटी 
३) राजस्थान (Rajasthan Royals)                       २८.९० कोटी 
४) बेंगळुरू (Royal Challengers Bangalore)    २७.९० कोटी 
५) दिल्ली (Delhi Capitals)                                   २७.८५ कोटी 
६) हैदराबाद (Sunrisers Hyderabad)                  १७.०० कोटी 
७) चेन्नई (Chennai Super Kings)                       १४.६० कोटी 
८) मुंबई (Mumbai Indians)                                  १३.०५ कोटी 



हेही वाचा  -

आता 'मिनी आयपीएल'! गांगुलीच्या डोक्यातली सुपीक कल्पना

पंचाना मारहाण; मुंबई सिटी एफसी संघावर बंदी, १० लाखांचा दंड




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा