Advertisement

आता 'मिनी आयपीएल'! गांगुलीच्या डोक्यातली सुपीक कल्पना

आयपीएलसोबतच आता 'मिनी आयपीएल' स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे.

आता 'मिनी आयपीएल'!  गांगुलीच्या डोक्यातली सुपीक कल्पना
SHARES

इंडियन प्रिमीयर लीगची (आयपीएल) ही स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहे. या आयपीएलसोबतच आता 'मिनी आयपीएल' स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भात बीसीसीआय विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या आयपीएलच्या गर्व्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. चॅम्पियन्स लीग स्पर्धा बंद झाल्यानंतर जो वेळ शिल्लक आहे, त्या वेळेत कोणती स्पर्धा घ्यावी यावर 'मिनी आयपीएल' हा पर्याय समोर आल्याचं समजतं. त्यामुळं आता लवकरचं बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी देणार आहे.

मिनी आयपीएल स्पर्धा

चॅम्पियन लीग ही स्पर्धा बंद झाल्यामुळं या स्पर्धेच्या शिल्लक वेळेत काय करायचं यावर बीसीसीआय विचार करत आहे. आयपीएल या मुख्यस्पर्धेबरोबरच मिनी आयपीएल स्पर्धा घ्यावी, असा एक विचार पुढे आला आहे. चॅम्पियन लीग स्पर्धा सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात १५ ते २० दिवसांसाठी आयोजित केली जात होती. परंतु, ही स्पर्धा बंद केल्यामुळं सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याचा काळ हा मोकळा राहत आहे. त्यामुळं या काळात बीसीसीआय आणखी एक आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे.

आयपीएलच्या ब्रँडचा विस्तार

मिनी आयपीएलमुळं आयपीएलच्या ब्रँडचा विस्तार देखील होऊ शकतो आणि बीसीसीआयला आर्थिक फायदा देखील होऊ शकते. आयपीएलच्या गर्व्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता बीसीसीआयच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

बैठकीत चर्चा

आयपीएलमधील संघांचे सामने परदेशात खेळवण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली. आयसीसीशी संलग्न देशांसोबत आयपीएलच्या संघांचे सामने खेळवण्याच्या बीसीसीआय विचारात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आयपीएलमधील संघ अन्य देशात सामने खेळतील. अशा प्रकारच्या सामन्यांमुळे आयपीएलची लोकप्रियता आणि त्याच्या चाहत्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचं मत या बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

महापालिकांमधील प्रभाग पद्धत रद्द होणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख, दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती सर्वोच्चपदी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा