Advertisement

मुंबई इंडियन्स किराॅन पोलार्डला डच्चू देणार?


मुंबई इंडियन्स किराॅन पोलार्डला डच्चू देणार?
SHARES

गेल्या दहा वर्षांपासून अायपीएलमधील मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग असलेल्या किराॅन पोलार्डला या वर्षी मुंबई संघ डच्चू देणार अशी चर्चा अाता रंगू लागली अाहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ११ व्या पर्वासाठी खेळाडू रिटेन ठेवण्याची तारीख ४ जानेवारी असून मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पंड्या अाणि कृणाल पंड्या या तीन खेळाडूंना अापल्या संघात कायम ठेवणार असल्याचे बीसीसीअायच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र फ्रँचायझीने जसप्रीत बुमरा अाणि किराॅन पोलार्डएेवजी कृणालला का पसंती दिली, याचेच सर्वांना अाश्चर्य वाटत अाहे.


रोहित, पंड्याला पहिली पसंती

रोहित शर्माने मुंबईला अायपीएलची तीन जेतेपदे मिळवून दिली अाहेत तसेच हार्दिक पंड्या हा मॅचविनर खेळाडू असल्यामुळे या दोघांना मुंबई इंडियन्सने पहिली पसंती दिली अाहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळेच कृणालला मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.


पोलार्डही राहू शकतो संघासोबत

कृणालला रिटेन ठेवण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला अाहे. कारण 'राइट टू मॅच' कार्डद्वारे जसप्रीत अाणि पोलार्ड यांना विकत घेण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे अाहे. कोणत्याही संघाला लिलावाअाधी तीन खेळाडू रिटेन ठेवणे अाणि लिलावादरम्यान 'राइट टू मॅच' कार्डद्वारे दोन खेळाडू पुन्हा विकत घेण्याची संधी मिळणार अाहे. प्रत्येक फ्रँचायझीला पाच खेळाडू रिटेन ठेवता येणार असून ११व्या पर्वासाठीचा लिलाव २७ अाणि २८ जानेवारी रोजी रंगणार अाहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा