Advertisement

IPL जेतेपदाच्या 'हॅट्रीक'साठी मुंबई इंडियन्स चेन्नईत दाखल

सहाव्यांदा आयपीएलचे जेतेपदं जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे.

IPL जेतेपदाच्या 'हॅट्रीक'साठी मुंबई इंडियन्स चेन्नईत दाखल
SHARES

सहाव्यांदा आयपीएलचे जेतेपदं जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू नवीन जर्सीमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा (rohit sharma) एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होणार आहेत. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असणार आहेत. यावर्षी कोरोना व्हायरसमुळं आयपीएलमधील (IPL) सामने ८ शहरांमध्ये होणार नाहीत. यावेळी ठराविक शहरांमध्येच आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्सची कामगिरी नेमकी कशी होते, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल. यावर्षी आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे.

मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.



हेही वाचा -

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंत

कोरोनाग्रस्त सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा