नमन पय्याडे, एमआयजी स्पोर्टस् क्लब, ऑलिम्पिया स्पोर्टस् विजयी

  Goregaon
  नमन पय्याडे, एमआयजी स्पोर्टस् क्लब, ऑलिम्पिया स्पोर्टस् विजयी
  मुंबई  -  

  लखारिय क्रिकेट लीगच्या 14 वर्ष वयोगटात झालेल्या सहाव्या दिवशीच्या सामन्यात नमन पय्याडे, एमआयजी स्पोर्टस् क्लब आणि ऑलिम्पिया स्पोर्टस् या संघांनी विजय मिळवला. नमन पय्याडेने गोरेगाव स्पोर्टस् क्लबला ५७ धावांनी मात देत विजय मिळवला.

  एमआयजीने 30 षटकात 4 गडी राखत 213 धावा करत माहिम जुवेनाईलला 69 धावांनी हरवले. ऑलिम्पिया स्पोर्टने विनस स्पोर्टचा 65 धावांनी पराभव केला. ऑलिम्पियाने 30 षटकांत 181 धावा केल्या.

  ही स्पर्धा राऊंंड रॉबिन या पद्धतीत होत आहे. हे सामने गोरेगाव स्पोर्टस् क्लब, एमआयजी, शिवाजी पार्क, कांदिवलीतले पय्याडे ग्राऊंड, आरे भास्कर ग्राऊंड आणि माटुंग्यातील डीपीसीमध्ये महिनाभर सुरू राहणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.