Advertisement

स्वाभिमान पक्षातर्फे २४ डिसेंबरला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते गणेश रहाटे यांच्यातर्फे येत्या २४ डिसेंबर रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघासाठी तब्बल एक लाखांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

स्वाभिमान पक्षातर्फे २४ डिसेंबरला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते गणेश रहाटे यांच्यातर्फे येत्या २४ डिसेंबर रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघासाठी तब्बल एक लाखांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

प्रमुख अतिथी...

ही स्पर्धा जनरल अरुण कुमार वैद्य क्रिडांगण, बोरिवली येथे खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि रणजी खेळाडू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.कशी असेल स्पर्धा?

या क्रिकेट स्पर्धेत एकूण ८ संघांचा समावेश असणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा टेनिस चेंडूची असणार आहे. यामध्ये विजेत्या संघास एक लाख, तर उपविजेत्या संघास ५० हजारांचे रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज यांना अनुक्रमे २ हजार, २ हजार आणि २ हजार ५०० रुपये बक्षिस म्हणूनही देण्यात येणार आहेत.

एन्जॉय ट्रॉफीलाही सहकार्य

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते गणेश रहाटे यांंनी बोरिवलीमध्ये रविवारी झालेल्या एन्जॉय ट्रॉफलादेखील प्रायोजक म्हणून सहकार्य करत स्पर्धेला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अंधेरीच्या उमर इलेव्हनने जेतेपद पटकावले, तर दादरच्या एफसी इलेव्हन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा