इंग्लंडमध्ये होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांच्या 'चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाचा नवीन प्रायोजक असलेली चिनी मोबाइल उत्पादक कंपनी ओप्पोचा लोगो नव्या जर्सीवर असेल. ओप्पोने गुरूवारी एका दिमाखदार सोहळ्यात या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
या जर्सीचे अनावरण बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि ओप्पोचे भारतातील प्रमुख स्काय ली यांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दलची माहिती बीसीसीआयने आपल्या टि्वटर हॅण्डलवर पोस्ट केली आहे.
https://twitter.com/oppomobileindia">@oppomobileindia https://twitter.com/hashtag/OPPO?src=hash">#OPPO https://twitter.com/hashtag/TeamIndia?src=hash">#TeamIndia - https://twitter.com/RJohri">@RJohri https://t.co/hDoLAq6XJn">pic.twitter.com/hDoLAq6XJn
— BCCI (@BCCI) https://twitter.com/BCCI/status/860041911914180609">May 4, 2017
1 जूनपासून सुरू होणाऱ्या 'चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या अगोदर या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. ओप्पो मोबाइल कंपनीने भारतीय संघासोबत करार केला असून हा करार पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. या करारातून बीसीसीआयला ५३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचा अंदाज आहे.
बीसीसीआय आणि ओप्पोमध्ये झालेल्या करारानुसार ओप्पो कंपनी दि्वपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 4.61 कोटी रुपये, तर आयसीसीच्या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी 1.56 कोटी रुपये देणार आहे.
यापूर्वी स्टार इंडिया भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक होता. बीसीसीआयने स्टार इंडियासोबत 1 जानेवारी 2014 रोजी केलेला करार 31 मार्च 2017 ला संपला. त्यानंतर स्टार इंडियाने प्रायोजकत्वासाठी दुसऱ्यांदा बोली न लावण्याचा निर्णय घेतला होता.